Title | : | THE MIRACLE |
---|---|---|
Author | : | Irving Wallace |
Release | : | 2021-07-07 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 4633402 |
लूर्द फ्रान्समधलं एक छोटसं गाव. खिश्चनधर्मीयांचं पवित्र श्रद्धास्थान. एक किसानकन्या; एपीआय् या वृत्तसंस्थेची, एक सुमार रूपाची, पण बुद्धिमान वार्ताहर; एक रूपसंपन्न, निष्णात मानसशास्त्रज्ञ आणि तिचा गुणसंपन्न,देखणा प्रियकर; रशियन पंतप्रधानकीची महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक रशियन परराष्ट्रमंत्री; साधी-सरळ, निष्कपट, नोकरदार ब्रिटिश महिला नि तिचा अनेक ‘उद्योग’ करणारा नवरा; एक अंध, पण रूपवान इटालियन तरुण अभिनेत्री नि तिचा क्रांतिकारक प्रियकर. वेगवेगळ्या स्वभावांच्या,व्यक्तिमत्त्वांच्या; वेगवेगळ्या थरांतल्या या व्यक्ती लूर्दला गोळा होतात आणि सुरू होतं एक उत्कंठापूर्ण , काहीशी रहस्याची छटा असणारं नाट्य. श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्यांतील द्वंद्वाच्या आधारे उलगडत जाणारी कहाणी. श्रद्धेचा आणि धर्माचा ‘वापर’ आणि ‘व्यापार’ करुन घेण्याची वृत्ती सार्वत्रिकच असते. म्हणूनच ‘द मिरॅकल’ वाचून विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी वाचक आपले विचार, आपला धर्म आणि आपलं राष्ट्र यांबाबत अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा नव्यानं मांडणी करील, असं वाटतं. |